देवपूर पोलिसांनी केली घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, मुद्देमाला सकट दोघा सराईतांच्या परभणी येथून आवळल्या मुसक्या..
धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरपोडी गुन्ह्याची उकल देवपूर पोलिसांनी करत, परभणी येथील दोघा सराईतांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे, धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी नगर येथून सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी घरफोडी झाल्याची तक्रार देवपूर पोलीस ठाण्यात दाखल होती,या घोरफोडी दरम्यान चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते, 3 लाख 90 हजार 782 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता, पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासाची चक्र फिरवली असता परभणी येथील दोघा सराईतांच्या देवपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून जवळपास 4 लाख 52 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, यादरम्यान देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी