धुळे – भाजपा जुन्या-पुराण्या, फाटक्या- ठिगळ लावलेल्या पारदर्शक साड्या रेशन दुकानावर वाटून भारतातील मायबहिणींची अब्रू काढण्याचे घाणेरडे व खालच्या पातळीचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या योजनेचाजगभर डांगोरा पिटवून ते भारतातील गरिबीची जगभर बदनामी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रपरिषदेत केला. एकीकडे ४७ % लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असे सांगतात मग ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटत असल्याचा ही डांगोरा का पिटतात ? असा सवाल ही त्यांनी केला.
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आपल्या शैलीत तोफ डागली आहे. पत्रकार परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींसमोर ते म्हणाले,’रेशन दुकानांवर मोदी साड्या वाटल्या जातंय परंतु, या साड्यांची अवस्था बघितली तर त्या अत्यन्त टाकाऊ अशी आहे. या पारदर्शक साड्या घालून भाजपने त्यांच्या महिला नेत्यांना ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवावे. वास्तविक हा आपल्या आया-बहिणींची अब्रू काढण्याचा प्रकार असून अश्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या भाजपने भारताच्या गरिबीची जगभर बदनामी करणे चालवले आहे. तसेच ४७% लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणल्याचे ते सांगतात तर दुसऱ्या बाजूला ८०% लोकांना मोफत धान्य वाटप करतो असे हि म्हणतात. मग गरिबीरेषेच्या वर आणलेले लोक कोणते असा सवाल ही गोटे यांनी केला.
रेशन दुकानावर ५ किलो तांदूळ, ३ किलो गहू वाटप होते. ज्याची शासकीय किंमत केवळ ९० रुपये इतकी होते. याचे श्रेय घेतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेली धान्य देशाच्या कोठारात सडत पडले आहे. त्याला योग्य भाव मिळत नाही.अशी अवस्था भाजपने केल्याचे ही गोटे म्हणाले. कल्याण भवन मध्ये झालेल्या या पत्रपरिषेदेला तेजस गोटे, प्रशांत भदाणे, विजय वाघ, यांची उपस्थिती होती. याच वेळी त्यांनी आपल्या म्हणण्याचे लेखी स्वरूपात पत्रकही पत्रकारांच्या हाती दिले.