विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जीव हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेने लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालया नंतर या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
शाळेत शिक्षा भेटेल ही भिती आताच्या काळात विद्यर्थ्यांना राहिलेली नाही, यामुळे मुले शाळेत हसत खेळत जातात. असे असताना पुण्यातील या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे घटना समोर आहे.
घडले असे की, वर्गातील मुले वर्गात गोंधळ घालत होते. तेव्हा गोंधळ होत असल्याचे ऐकून अचानक शिक्षिका वर्गात आल्या, त्यांना बघून सर्व मुले जागेवर जाऊन बसलीत. परंतु शिक्षिका पुजा केदारी यांनी रागात तक्रारदाराच्या मुलास लाथा व बुक्यांनी बेदम मारहाण केली. हि घटना घडून महिना झाला. त्यावेळी मुलाने भीतीने हे प्रकरण पालकांना सांगितले नाही. परंतु मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा व्हिडिओ मुलाच्या पालकाच्या पाहण्यात आला. . त्यानंतर मुलाला विचारण्यात आले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला, असे पालकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शालेय व्यवस्थानाने या शिक्षकेवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.