महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. यात नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाचा हि समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदार सांघाचे कपिल पाटील हे येत्या ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या ४ जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ मे रोजी या बाबतची अधिसूचना जाहीर होईल. २२ मी पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. २४ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर २७ मे हि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात अली आहे.. १० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात येऊन १३ जून रोजी मतमोजणी होईल.
नसिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी इच्छुकांनी या पूर्वीच मोर्चे बांधणी सुरु केली असून शिवसेनेच्याउपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी अनेकदा मतदार संघ पिंजून काढला आहे.