दलित,आदिवासी,मुस्लिम मतदान रोखण्यासाठी भाजपचे षडयंत्र, मा.आ.अनिल गोटे यांचा आरोप

धुळे – प्रतिनिधी :
धुळे लोकसभा मतदार संघात आता शेवटच्या टप्प्यात भाजपच्या वतीने कटकारस्थान रचले जाण्याची भीती माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली आहे. मतदार संघातील दलित,आदिवासी,मुस्लिम,झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी मतदानासाठी बाहेर पडू नये,याकरिता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे कारस्थान रचले जात आहे. मात्र पैसे आले तर जरूर घ्या,मिळत नसतील तर मागून घ्या. पण,मतदान जरूर करा.असे आवाहन गोटे यांनी केले आहे. चोराच्या घरात चोरी करणे पाप नाही असे ही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री.गोटे यांनी पत्रकात नमूद केले आहे की, धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. कांद्याच्या प्रश्नाने शेतकरी अक्षरशा मेटा कुटीला आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सत्तारूढ पक्ष लहान मोठ्या नेत्यांना आमिष दाखवून फिरवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्याच वेळी ते सामान्य जनतेच्या मनातून उतरत आहेत. आजपर्यंत आपल्याला मतदान करण्यासाठी हजार-पाचशे एका मतासाठी वाटले जात असत. पण पैसे घेऊन मतदान करतीलच याची शाश्वती नसल्याने लोकसभा निवडणुकीत निगेटिव्ह करप्शन करण्याची मागच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालेली नवी आयडिया वापरात आणण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आज पर्यंत निवडनुकीमध्ये आपल्याला मत मिळावे म्हणून हजार- दोन हजार रुपये सर्रास वाटले जात होते. देशभरातील जनता महागाई,बेरोजगारी, धार्मिक तेढ इत्यादी दैनंदिन प्रश्नाने हैराण झाली आहे. असा तळागाळातील वर्ग तसेच शेतकरी, शेतमजूर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मत देणार नाही याची खात्री पटल्याने धोका नको या भीती पोटी निगेटिव्ह करप्शन अमलात आणीत असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.
मतदानाच्या एक दोन दिवस आधीच रात्री अपरात्री मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान न करण्याचे प्रत्येक मतदारास प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे पैसे देऊन ज्यांनी ज्यांनी रक्कम स्वीकारले आहे. त्यांच्या बोटाला शाई लावून तो मतदान केंद्रावर जाऊ शकणार नाही, अशी ही निगेटिव्ह करप्शनची युक्ती अमलात आणण्याच्या कारस्थानाची सूत्रे अत्यंत विश्वासू (बहुतेक शिक्षक वगैरे कर्मचारी) लोकांकडे सोपवली जाईल, अशी शक्यता पत्रकातुन व्यक्तर करण्यात आली आहे. आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की,अशा पद्धतीने पैसे येतील,असे पैसे आले तर जरूर घ्या,तुमच्या भागात मिळत नसतील तर हक्काने मागून घ्या! पण बोटाला शाई मात्र लावून घेऊ नका,कारण बोटाला शाई लावून तुम्हाला मतदानापासून रोखण्याचा हाच तर खरा नवा पॅटर्न आहे.
माझे सर्व तरुण मित्रांना आवाहन आहे की,आपल्याला भागात परिसरात दिसतील तिथे त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्या,बिलकुल संकोच करू नका, एक लक्षात असू द्या की,चोर के घर में चोरी करना कुछ गलत नही.पाप की भावना भी मन की छु मत देना,घाबरू नका.. मी तुमच्या पाठीशी आहे,असा विश्वासही माजी आमदार गोटे यांनी पत्रकातुन दिल्याचे लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे व विजय वाघ यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares