धुळे I प्रतिनिधी : आम्ही ‘लष्कर ए तय्यबा’ या अतिरेकी संघटनेकडून बोलत आहोत असे सांगून फसवणूक करण्यासाठी भ्रमणध्वनीवर कॉल करणाऱ्या दोघांच्या धुळ्यात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर केला. पण, त्यांचे हे खोडसाळ कृत्य सायबर पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाही.
धुळे, प्रतिनिधी : आम्ही ‘लष्कर ए तय्यबा’ या अतिरेकी संघटनेकडून बोलत आहोत असे सांगून फसवणूक करण्यासाठी भ्रमणध्वनीवर कॉल करणाऱ्या दोघांच्या धुळ्यात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरचा वापर केला. पण, त्यांचे हे खोडसाळ कृत्य सायबर पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाही.
जय टायगर सिक्युरिटी एजन्सीचे व्यावसायिक इम्रान शेख (२८,रा.प्लॉट नं. मुल्ला कॉलनी,चाळीसगाव रोड,धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २१ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता आंतराष्ट्रीय कोड असलेल्या नंबर वरून त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हाट्सअप कॉल आला. बोलणाऱ्याने आपण ‘लष्कर ए तय्यबा’ या दहशतवादी संघटनेतून बोलत असल्याचे सांगितले त्यामुळे सुरुवातीला शेख हे घाबरले. त्यांनी तात्काळ सायबर पोलिसात धाव घेतली. जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून आंतरराष्ट्रीय वर्चुअल नंबरची माहिती काढण्याच्या सूचना सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना केल्यात. तपासानंतर देवपुरातील शनिमंदिर नजीक राहणारा ऋषिकेश भांडारकर यानेच आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरच्या माध्यमातून शेख याना भ्रमणध्वनी केल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे भांडारकर हा शेख यांच्या परिचयातील आहे. आपले बोलणे खरे वाटावे यासाठी ऋषिकेशचा मित्र खालिद अन्सारी याने हिंदी भाषेत शेख यांच्याशी संभाषण केले. दोघेही धुळे शहरातील रहिवासी असून आपली ओळख लपवून आपल्याच ओळखीच्या इम्रान शेख यांना त्यांनी व्हर्चुअल नंबरच्या माध्यमातून कॉल केल्याचे निष्पन्न झाले.
अर्थात हा प्रकार त्यांनी खोडसाळपणे केल्याचे ही सांगण्यात आले. पोलीस निरिक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी करून या दोन्हीही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.