दोंडाईचा- प्रतिनिधीशहरासह परिसरात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा परिस्थितीत महावितरण विभागाकडून वेळोवेळी विज पुरवठा खंडित करत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. म्हणून आज दि. २७ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर मोर्चा नेत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यापुढे अशाप्रकारे विज पुरवठा खंडित केल्यास व नागरिकांना त्रास झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला..
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा शहर परिसरात 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असताना देखील वारंवार वीजपुरवठा खंडित करत असतात. भयंकर स्वरूपात उष्णता वाढली आहे. त्याच वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा परिणाम अबाल वृद्धांना होत असून लहान मुले तसेच वृद्ध यांची अतोनात हाल होत आहे. अशा वेळेस एकीकडे शासन उष्माघातापासून वाचवण्यासाठी उपयोजना करत आहे तर दुसरीकडे प्रशासन अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्यापासून दिवसातून जवळच पंधरा ते वीस वेळा तसेच रात्री विद्युत पुरवठा बंद होत असल्यामुळे अतोनात नागरिकांचे हाल होत आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. याची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेत आज शहरातील सेंट्रल बँक जवळील महावितरण कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी यानंतर विजपुरवठा खंडित होणार नाही असे आश्वासित केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांची निवेदन देत अधिकारी व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच लाईनमन वायरमन अधिकारी हे ग्राहकांशी अर्वाच भाषेत बोलत असल्याची तक्रार देखील यावेळी करण्यात आली.
निवेदनावर शानाभाऊ सोनवणे, शैलेश सोनार, मनोज परदेशी, विलास पाटील, दीपक मराठे, नरेंद्र धात्रक, अमोल कापडणीस, अक्षय चौधरी, सतीश कोळी, मुकेश कोळी, महेंद्र धनगर, विशाल भोई, भूषण भोई, हितेश मोरे, गोपाल भोई, अजय पाटील, विक्की पाटील, शुभम भोई, आबा चित्ते, विनय भोई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.