दोंडाईचा- काल दि. २९ रोजी शिंदखेडा पंचायत समिती सभागृहात शिंदखेडा तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण प्रदीप कुमार निकम मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे हे अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी श्री अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, शितलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा, अभय कोर, कृषी अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा डीलर्स असोसिएशनचे श्री रंजीत राजपूत व संजय चौधरी हे उपस्थित होते
श्री अरुण तायडे यांनी विक्रेत्यांना बियाणे कीटकनाशके व रासायनिक खत कायद्यांची माहिती दिली व विक्रेत्यांनी खरीप हंगामात घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले
श्री शितल कुमार तवर यांनी विक्रेत्यांनी ठेवावयाच्या दस्तऐवजाबाबत माहिती दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री अभय कोर यांनी केले
अध्यक्ष भाषण करताना श्री प्रदीप कुमार निकम यांनी जिल्ह्यात झालेल्या कारवाईबाबत माहिती दिली व विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बियाणे खते यांची ज्यादा दराने विक्री करू नये अशी तंबी देण्यात आली..