धुळ्यातील निर्दयी डॉक्टरने केली भिकाऱ्यालाबेदम मारहाण

धुळ्यात फाशी पूल लगत असलेल्या एका हॉस्पिटल बाहेर खुद्द डॉक्टरनेच एका भिकाऱ्यास काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री समोर आला. परिसरातील रहिवाश्यांच्या मोठी गर्दी करून संबंधित डॉक्टरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत शांतता प्रस्थापित केली. पायाला जबर जखम झालेल्या भिकाऱ्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
फाशी पूल नजीक डॉ. मुकर्रम खान यांचे हॉस्पिटल आहे. त्या बाहेर गेल्या काही दिवसापासून एक भिकारी रात्रीच्या वेळी बसत असल्याचे सांगण्यात येते. त्यास डॉक्टर खान यांनी गुरुवारी रात्री काठीच्या साहाय्याने त्याच्या पायांवर बेदम मारहाण केली. त्याला रक्त बंबाळ होऊन रडताना बघून परिसरातील रहिवाश्याना दया आली. त्यांनी या बाबत डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयन्त केला. पण तोवर डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले. जखमी भिकाऱ्यास नागरिकांनीच सरकारी रुग्णालयात नेले. एकीकडे आपण डॉक्टरांना देव मानतो, मग या डॉक्टरने एका गरीब व्यक्तीला इतक्या निर्दयीपणे का मारले? डॉक्टर असून त्यांना त्याची दया आली नाही का ? व्हाईट कॉलर मधेही इतकी गुंडगिरी का? सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला मारहाण केल्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी पोलीस बोलविणाऱ्या डॉक्टरांनी त्याला मारण्याआधी पोलीस का बोलाविले नाही? मारण्यापेक्षा पोलिसांच्या हवाली करता आले असते, एवढे मारण्याची गरज काय? असे एक ना अनेक सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत असल्याचे जाणवले. यावेकी नागरिक डॉक्टर खान यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त करताना आढळून आले.

पोलीस प्रशासनाला देणार निवेदन

डॉक्टर मुकर्रम खान हे प्रत्येकवेळी दादागिरी करतात, असा नागरिकांचा आरोप असून गरीब बिचाऱ्या भिकाऱ्यास केलेल्या बेदम मारहाणी बद्दल पोलीस प्रशासनाला निवेदनदेण्याची तयारी रहिवाश्यांच्या दाखविली आहे. एकजूट करून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. उमीद या सेवाभावी संस्थेचे सचिन पाटील हेही गुरुवारी रात्री घटनास्थळी उपस्थित होते. गरिबाला कोणी वाली नाही काय ? असा सवाल करीत त्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून आपण देखील आपल्या संस्थेमार्फत निवेदन देणार असल्याचे त्यांनी “झेप मराठी” ला सांगितले.

डॉक्टरांनी केली सारवासारव

डॉक्टर मुकर्रम खान यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, मुळात हा माणूस गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हॉस्पिटल बाहेर बसतो आहे, तो नशेबाज आहे. त्याला आपण समजावून सांगण्याचा प्रयन्तही केला परंतु नशेत असल्याने त्याने आपल्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाय तो गेट समोर रस्त्यावरच आडवा झोपला. त्यामुळे आपण काठीच्या साहाय्याने त्यांच्या पायावर हळुवार मारून त्यास हटकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पायावर आधीपासूनच जखम असून पाय सडलेला असल्याचे जाणवत होते, पायाला आधीपासूनच पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्याने नखांनी स्वतःच रक्त काढले आणि ओरडू लागला, त्यामुळे परिसरातील नागरिकांचा गैरसमज झाला त्यांनी गर्दी केली म्हणून आपण पोलिसांना बोलविल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares