धुळे – शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आता वेगळे ट्विस्ट आले असून शिवसेनेच्या उपनेत्या तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा शुभांगी पाटील यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली असतानाच शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने त्यांचा पत्ता कट करून नाशिकच्या संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे संदीप गुळवे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उमेदवारीची बक्षिसी मिळाली आहे.

शिक्षक मतदार संघ निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे.येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून अर्ज भरण्यासाटःई ७ जून हि शेवटची मुदत आहे. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात ही केली आहे. शुभांगी पाटील या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षा असून शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वी पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही लढवली असून त्यावेळी त्यांना ४९ हजार मते मिळाली आहेत. याच बळावर त्या आता शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्यासाठी आधीपासून मोर्चे बांधणी करीत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना शिवसेनेतर्फे अर्थात महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र , या निवडणुकीने आता वेगळीच कलाटणी घेतली असून माजी मंत्री गोपाळराव गुळवे यांचे सुपुत्र संदीप गुळवे याना उमेदवारी जाहीर केलीय. श्री. गुळवे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असून आता ते महाविकास आघडीतर्फे उमेदवारी करणार आहेत.
शुभांगी पाटील करणार बंडखोरी
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा तथा शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांना आपल्याच पक्षाकडून उमेदवारीत डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्या आता बंडखोरी करण्याच्या पवित्रता असून सोमवारी ३ जून रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वास्तविक विधानपरिषदेची ही जागा काँग्रेसच्या वाटेल असताना प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्याकडे मागणी करून आपण ही जागा शिवसेनेसाठी मिळवली परंतु, आता आपल्यालाच डावलण्यात आले असून आर्थिकदृष्ट्या सक्षममतेचा विचार करण्यात आलाय, असे शुभांगी पाटील यांचे म्हणणे आहे. शिक्षकांच्या सोबत काम करताना, त्यांच्या समस्या जाणून घेताना गेल्या १० वर्षात अनेक आपण अनेक आंदोलने केली, मुंबईत धरणे धरले, सरकारचे लक्ष वेधून अनेक निर्णय घ्यायला भाग पाडले, आपल्या आंदोलनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील शिक्षक आपल्याला ओळखतात, असे सांगतानाच या मतदार संघातील विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांची कामे कोणती ? असा सवाल ही शुभांगी पाटील यांनी झेप मराठीशी बोलताना उपिस्थत केला.