धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा योजनेचे श्रेय लाटण्याकरता सत्ताधारी भाजपाने जाणून बुजून नकाणे तलाव भरण्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप करीत यासंदर्भातशिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक्सप्रेस व जम्बो कॅनॉल वर जाऊन या दोन्ही कॅनॉलच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करून सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली होती, या कॅनॉलची जबाबदारी असणारे अभियंता विवेक महाले यांनी शिवसेनेच्या निवेदनाला व आंदोलनाला प्रतिसाद देत आठवडाभरात साडेसात किलोमीटरच्या एक्सप्रेस कॅनॉलची स्वच्छता युद्ध पातळीवर करून घेतल्याने समाधान व्यक्त केले.
यंदाच्या उन्हाळ्यात धुळेकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून अक्कलपाडा व तापी पाणीपुरवठा योजना नियोजनाच्या अभावामुळे फेल करण्याचे काम मनपा पाणीपुरवठा विभागाने केले आहे त्यातच भरीस भर म्हणून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याकरता नकाणे तलाव जाणून-बुजून कोरडा ठेवण्यात आला नकाणे तलाव भरण्यासाठी एक्सप्रेस कॅनॉल व जम्बो कॅनॉलचा वापर करून हरण्यामाळ तलावातून पाणी नकाणे तलावात सोडले जाऊन तो तलाव उन्हाळ्यात धुळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्ष वापरात आणला जात होता, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा योजनेचे श्रेय लाटण्याकरता सत्ताधारी भाजपाने जाणून बुजून नकाणे तलाव भरण्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी यांनी एक्सप्रेस व जम्बो कॅनॉल वर जाऊन या दोन्ही कॅनलच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करून सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे या कॅनलची पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली होती, या कॅनॉलची जबाबदारी असणारे अभियंता विवेक महाले यांनी शिवसेनेच्या निवेदनाला व आंदोलनाला प्रतिसाद देत केवळ आठवडाभरातच साडेसात किलोमीटरच्या एक्सप्रेस कॅनॉलची स्वच्छता युद्ध पातळीवर करून घेतली, व या करण्यात आलेल्या स्वच्छतेबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा प्रत्यक्ष जागेवर स्वच्छतेबाबत पाहणी करून घेण्यास सांगितले, त्यामुळे शिवसेनेने सिंचन विभागाचे आभार मानले असून एक्स्प्रेस कॅनॉलची स्वच्छता तर झाली पण जम्बो कॅनॉलची कधी स्वच्छता करणार असा प्रश्न देखील सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना विचारला असून येत्या पंधरा दिवसात या जम्बो कॅनलची देखील स्वच्छता युद्धपातळीवर करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच यंदाच्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यात येऊन नदीपात्रात वाया जाणारे पाणी या दोन्ही कॅनलमध्ये टाकून त्याद्वारे सुरुवातीला हरण्यामाळ व नंतर नकाणे तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे उपनेत्या शुभांगी पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री,शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, मा.आ.प्रा शरद पाटील किरण जोंधळे, मा.महापौर भगवान करणकाळ धीरज पाटील,डॉ सुशील महाजन, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी , देविदास लोणारी,ललित माळी,गुलाब माळी, नितीन शिरसाठआदींसह सर्व शिवसेना उपमहा नगर प्रमुख व विभाग प्रमुख यांनी केली आहे.
