सख्खा बाप निघाला पक्का वैरी,अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीला संपवून नाल्यात पुरले

दिवसेंदिवस माणूस हैवान होत चालल्याची रोज नवीन उदाहरणे समोर येत आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून एकमेकांना संपविण्याच्या घटना घडत आहेत. धुळे जिल्यातील शिरपूर तालुक्यात नांदर्डे येथे उघडकीस आलेली घटना तर मन हेलावून टाकणारी आहे. वन जमीन शिवारात राहणाऱ्या अनिल पावरा याने आपल्याच अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात लाकडी दांडका मारून तिला ठार मारले. मुलगी रडत असल्याने दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले. नशा उतरल्यावर त्याला मुलगी मेल्याचे लक्षात आल्यानंतर पुरावा नाहीसा करण्यासाठी त्याने पहाटे नजीकच्या नाल्यात पुतळ्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन प्रेत उगारले. . उत्तरीय तपासणी साठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात प्रेत हलविण्यात आले. संशयित आरोपी अनिल पावरा यास पोलिसांनी अटक केली आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares