नंदुरबार जिल्ह्यातील शहादा उपविभागीय कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महासर्हटर राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.हातात लाल झेंडे आणि घोषणाबाजी करीत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला.. प्रलंबित वन दावे ताबडतोब मंजूर करून जमिनींचे वाटप आणि सातबारे उतारे देण्यात यावे हि मोर्चेकऱ्यांचे प्रमुख मागणी आहे.. याशिवाय गायरान व पडीत जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी.. या ठिकाणी बांधलेली घरे लोकांच्या नावावर करावी. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा ३ हजार रुपये अदा करावेत अश्या १८ मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी दिले.. हा मोर्चा शहरातील परमौख रस्त्यांवरून प्रांत कार्यालयाकडे नेण्यात आला. मोर्च्यात सहभागी झालेल्या महिला पुरुषांच्या हातातील लाल रंगाच्या झेंड्यानी साऱ्यांचे लक्ष वेधले प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार, शहादा
