शहादा – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरालगत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणं झालीय. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहेत. खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी होते आहे.
शहादा शहरातील पाडळदा चौफुली ते लोणखेडा दरम्यान गेल्या चार महिण्यापासुन जड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थीती गंभीर झाली आहे. पाटील वाडी बंगल्या समोर तसेच जँकवेल वळण रस्ता ठिकाणी झालेले भल्या मोठ्या खड्यातुन वाहन चालतांना डान्स करावा लागतो आहे. तसेच रस्त्यावर पादचारी, वाहनांची रोजच वर्दळ असते. ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरु पहात आहेत . खड्ड्यात पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडुन रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील डामरखेडा गावा लगत प्रकाशा रस्त्या गोमाई नदी पात्रात खुप वर्षांपुर्वी पुलाचे बांधकाम केले आहे. याच पुलाला लागुन नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. जुना झालेला पुलाच्या वरती ठिकठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने तसेच पुलाच्या खांबाला बारीक तडे गेल्याने पुलाच्या दुरुस्ती ची देखील मागणी होते आहे
- सलाउद्दीन लोहार