२१ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद बंद
धुळे । प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदारसंघसाठी आज 26 जून रोजी मतदान झाले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली . सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जिल्हे मिळून 93. 46 टक्के मतदान झाले. एकूण 69 हजार 368 मतदारांपैकी 64 हजार 846 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात नंदुरबार मध्ये 96.12 टक्के, धुळे 93.77 टक्के, जळगाव 95.26 टक्के, नाशिक 91.63 टक्के आणि अहमदनगर 93.88 टक्के मतदान झाले .
निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाड उमेदवार संदिप गुळवे शिंदे गटाचे किशोर दराडे अजित पवार गटाचे महेंद्र भावसार अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात मुख्य लढत झाली .यासर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.