पहिल्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांचे परखड मत
जळगाव । प्रतिनिधी
शिवरायांचा देश म्हणवत असताना शिवरायांचीच जास्त उपेक्षा केली जात आहे. शिवाजी महाराजांवर भारतीयांसह ब्रिटीश,डच, पोर्तूगीज यांनीही विपूलन असे साहित्य लेखन केले आहे. त्यामुळे शिवरायांचे चरित्रात्मक अशी विपूल साहित्य संपदा असतानाही त्याचवर विश्वस्तरावर यापुव एकही संमेलन झालेले नाही. राजकारणी लोक केव राजकारणापुरताच शिवाजी महाराज की जय असे म्हणतात. मात्र त्यांचे अनुसरण करत नाहीत. त्यामुळे आम्ही कोठेतरी कमी पडत असल्याचे परखड मत शककर्ते शिवराय या ग्रंथाचे लेखक व पहिल्या श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी व्यक्त केले.
शिवचरित्रावरील साहित्य संमेलनातून शिव चरित्राचा जागर होण्याची गरज आहे. आज जळगावला होत असलेले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन जे यापुवच व्हायला हवे होते. शिवरायांच्ा संदर्भात शिवरायांची उपेक्षाच जास्त होत आहे. विश्वाच्या पातळीवर शिवाजी महाराज कसे श्रेष्ट आहे हे सांगणारी साधने उपलब्ध असताना देखील आम्ही कोठेतरी कमी पडत आहोत.
*मानवसंहारासाठी शोधाचा वापर*
————————-
आजचा काळ विकासाचा, विज्ञानाचा काळ आहे. पण एक लक्षात घ्या ज्या वैज्ञानिकांनी शोध लावले तेच आज स्वत:च दू:खी आहेत. असे आपल्याला पाहयला मिळत आहे. अणुबॉम्बचा शोध ज्यांनी लावला, त्याचा जपानमधील हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला केला, त्यातून जी हानी झाली त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत. त्यामुळे या संशोधनाचा पश्चाताप त्या संशोधकाला झाला. तो म्हणतो की त्याचे हात रक्ताळलेले आहेत. अशा प्रकारचा नरसंहार होईल याची मला कल्पना नव्हती. त्यामुळे मी चुकलो आणि या पुढे कोणतेही संशोधन करणार नाही असे त्याने जाहीर केले. त्यानंतर हा संशोधक त्याच्या परिवाराला घेवून अज्ञान स्थळी घेवून गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. अल्बर्ट आईस्टाईननेने त्यावेळी सरकारला सांगितले होते की अणुबॉम्बवर बंदी घाला. फार मोठी चुक आम्ही केली आहे. पण त्यावेळी सरकार म्हणाले होते की आता बाण तर सुटला आहे. त्यामुळे आता काहीच करता येणे शक्य नाही. त्यामुळे आज दूर्देवाने अणुबॉम्ब असणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे लक्ष्ाण समजले जाते. त्यामुळे आज सर्व जग दहशतीखाली आहे जे कधीच नव्हते. आता नाना प्रकारची संहारक शस्त्रे आपण पाहत आहोत त्यामुळे मानवता धोक्यात आली आहे.
*राजकारणात राष्ट्रकारण नव्हे तर स्वार्थकारण*
————————-
आजच्या राजकारणात राष्ट्रकारण कोठे आहे. जे शिवाजी महारांजांच्या काळात होतं. शिवराय हे राजकारणी नव्हते तर राष्ट्रकारणी होते. त्यांनी घोषणा केली होती की त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे. ज्यात शेतकरी, गोरगरीब यांना न्याय मिळेल, माताभगिनींची प्रतिष्ठा वाढेल. असे स्वराज्य त्यांनी स्थापन केले आणि ते सिध्द केले. शिवरायांना कोणी राजकारणी म्हणत असतील तरी त्यांत त्यांचा कोठे स्वार्थ होता. ते त्यांनी सिध्द करावे. पूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी खच घातले. किल्ले जिंकले ते स्वराज्यासाठीच. अठरापगड जातीधर्माचे लोक त्यांचे निष्ठावान होते. आज निष्ठा ही राहीलेली नाही त्यामुळे निष्ठावाणही राहीलेले नाहीत ही शिवरायाचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांची शोकांतिका आहे.
शिवरायांच्या महिला सन्मानाच्या बाताच
शिवराय महिला आणि मुलांबाबत फारच हळवे होते. शत्रु पक्ष्ााकडील स्त्रीला व तीच्या मुलांना पकडूण आणणाऱ्या मावळ्यांना त्यांनी दंड केला आणि त्या महिलेचा सन्मान करून तीला सुरक्ष्ाितरित्या तीच्या पतीच्या राज्यात जात स्वाधीन केले आणि झालेल्या चुकीची माफीही शिवरायांनी मागीतली होती. हा इतिहास जर आम्ही विसरणार असू तर आम्ही शिवरायांचे अनुयायी आहोत असे कोणत्या तोंडाने सांगता. नागालॅण्ड मध्ये काय होत आहे. अडीच वर्षाच्या मुलीसह महिलांवर अशोभनिय असे अत्याचार होत आहेत. त्यामुळे असे वाटते हाच का शिवरायांचा देश, हाच का तो शिवरायाचा महाराष्ट्र.
*शिवराय उरले केवळ राजकारणासाठी*
————————
केवळ राजकारणासाठी शिवाजी महाराज की जय म्हणायचे, आणि राष्ट्रनिर्मितीकडे डोळेझाक करायचे. त्यामुळे सध्यातरी शिवरायांचा वापर हा केवळ राजकारणासाठी आणि भावनांसाठी केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. हे सहन होणार नाही. महाभारतात भिष्म जेव्हा बाणांवर घायाळ होऊन पडला होता तेव्हा पांडवांनी त्याची भेट घेतली. तेव्हा राजा हा काळासाठी कारणीभूत आहे की काळ राजासाठी कारणीभूत आहे. तेव्हा भिष्माचार्यांनी लगेच उत्तर दिले जसा राजा असेल तसा काळ असतो. लोकशाहीत राजा पंतप्रधान आहे. सत्ता एका ठिकाणी केंद्रीत झाली आहे. जसा राजा तशी प्रजा असे चित्र दिसत आहे. शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. याचे उत्तर जनतेने शाधले पाहीजे. असे परखड मत विजयराव देशमुख यांनी व्यक्त केले.


