धुळे – शहरातील देवपुरात एस एस व्ही पी एस कॉलेज समोरील रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. यामुळे वाहतुकीस मोठा खोल्मबा होत असून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महानगरपालिका, भूमिगत गटार व भाजपा विरोधात आज तीव्र आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीने निवेदनात म्हटले आहे की , धुळे शहरांमध्ये मोठ्या गाजावाजा करून भाजपाने भूमिगत गटारीचे काम सुरू केले. परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले. 130 कोटीच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यानी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. पाच वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे, पण कोणतीही कामाची प्रगती झालेले नाही. एक थेंब सुद्धा पाण्याचा निचरा भूमिगत गटारी मध्ये झालेला नाही. संपूर्ण योजना ही फेल झालेली आहे. फक्त पैसे खाण्यासाठी सदर योजना मंजूर करण्यात आलेली होती. देवपूर येथील एसएसव्हीपीएस कॉलेज समोर गेल्या चार वर्षापासून काम चालू आहे. चार वर्षांमध्ये फक्त पंधरा फूट काम पूर्ण केलेले आहे. सदर कामामुळे चार वर्षापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या कामामुळे त्या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास तीन ते चार लोकांना स्वतःचे प्राण अपघातामध्ये गमवावे लागलेले आहेत. भूमिगत गटारीचा कोणताही उपयोग धुळे शहर वासियांना झालेला नाही. उलट या भूमिगत गटारीमुळे शहराचे नुकसान झालेले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचा आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळेस कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भाजपाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जेसीबी वर चढून निषेध व्यक्त केला. तसेच गेल्या चार वर्षापासून असणाऱ्या खड्ड्यांमध्ये भाजपचा झेंडा पुरून भाजपला खड्ड्यात गाढण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, भोला वाघ, भिका नेरकर, राजेंद्र सोलंकी, नंदू येलमामे, राजु डोमाडे, डॉमिनिक मलबारी, रामेश्वर साबरे, राजू मशाल, अमित शेख, दत्तू पाटील, कैलास भाऊ ,सोनू गुजर, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, मंगलदास वाघ, जयश्री घेटे, आकाश बैसाणे, बंटी वाघ, दीपक देसले, दीपक देवरे, हर्षल जैन, चेतना मोरे, शकीला बक्ष, रवी पवार, अशोक गवळे, राजू चौधरी, सागर चौगुले,राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, गोरख शर्मा, उषा पाटील,संदीप पाटील, विकी धिवरे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.