परसुळे गावातील अंगणवाडीत निकृष्ट पोषण आहाराचे वाटप – तक्रार

धुळे – शिंदखेडा तालुक्यातील परसुळे गावात अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषणआहार दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत आदिवासी टायगर सेनेने तक्रार केली असून या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा ही दिला आहे.
आंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना सकस व पोषक आहार मिळाला पाहिजे. यातून कुपोषणासारखी समस्या पळवून लावता येऊ शकते या उद्दात हेतूने शासनाने मोफत पोषण आहार देण्याची योजना अंमलात आणली. मात्र, परसुळे गावातील अंगणवाडीत अतिशय निकृष्ट, खराब पोषण आहार दिला जात असल्याचे निदर्शनास आले. अश्या आहारामुळे बालकांमध्ये सुदृढता येण्याऐवजी त्यांच्या प्रकृतीवरविपरीत परिणाम होऊ शकतो. या वयात निकृष्ट आहारामुळे त्यांना विविध आजारांचाही सामना करावा लागू शकतो. या संदर्भात आदिवासी टायगर सेनेच्या वतीने आवाज उठवण्यात आला असून या निकृष्ट आहाराला तीव्र विरोध केला आहे. बालकांना सकस आहार न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ही सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, रवींद्र सोनवणे, आसाराम सोनवणे, धनसिंग सोंवणे , बदल सोनवणे , सरदार सोनवणे , सोमनाथ सोनवणे , भावलाल सोनावणे , भटू सोनवणे आदींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares