धुळे : इयत्ता १०वी – १२वीचे निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र धुळ्यातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करताना दिसत आहेत. या बाबत विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकारी आणि युवा सैनिकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देत या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रवेश प्रकारीयेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट म्हणजे शिक्षण व्यवस्थेत व्यत्यय आणण्यासारखे आहे. या मुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणवर शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तसेच याच्या दूरगामी दुष्परिणामांना धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागू शकते. असा आरोप युवा सेनेतर्फे करण्यात आला. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी धुळे जिल्हा युवा सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा धुळे जिल्हा युवा सेने विस्तारक शंभूजी बागुल यांनी या वेळी दिला आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, धुळे