शहादा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलीये. याची लगेचचंअंमलबजावणी सुरु होऊन कागदपत्रांसह नावनोंदणीही सुरु झालीये त्यामुळे तहसील कार्यालयावर सध्या तोबा गर्दी होत असल्याचे आढळून येतेय. तसेच योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विविध खाजगी सायबर कॅफेंवर देखील नागरिकांची झुंबड उडतेय.. मात्र याचा फायदा घेऊन काही सायबर कॅफे चालक लागरिकांची लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात सेतू केंद्रासह खाजगी सायबर कॅफेवर लाडकी बहीण योजनेच्या साठी लागणाऱ्या कागदपत्रांचा पूर्ततेसाठी चांगलीच गर्दी होत आहेत याचाच फायदा घेत खाजगी सायबर कॅफे चालकांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचं आरोप देखील करण्यात येत आहेत उत्पन्नाचा दाखला भरण्यासाठी एरवी २० रुपये लागतात मात्र आता हाच फॉर्म भरण्यासाठी चक्क 80 रुपये जास्तीने घेतले जात आहेत. यासोबतच डोमासाईल सर्टिफिकेट साठी देखील दोनशे रुपये जास्तीचे दर आकारण्यात येत असून यात नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार,शहादा