धुळे – येथील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या दोन प्राथमिक विद्यामंदिरांच्या नामकरणाचा सोहळा ४ जुलै रोजी होतो आहे. संभाजीनगर येथील सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक डॉ रमेश पांडव यांच्या हस्ते आणि महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष महंत आचार्य साळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. सुप्रसिद्ध उद्योग संस्था ओमश्री ऍग्रो टेक प्रा. लि. हे या नामकरणातील प्रमुख देणगीदार आहे

संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्या मंदिराला श्रीमती मिश्रीबाई ओंकारमल अग्रवाल यांचे नाव देण्यात आले असून विकास प्राथमिक विद्या मंदिराला ओंकारमल सुवालाल अग्रवाल यांचे नाव देण्यात आले आहे. सुप्रसिद्ध उद्योग संस्था ओमश्री ऍग्रो टेक प्रा. लि. हे या नामकरणातील प्रमुख देणगीदार आहेत. उद्योजक संदीप अग्रवाल, सुनील अग्रवाल यांचे ते आजी-आजोबा असून यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.शहरातील जो.रा सिटी हायस्कुल च्या प्रांगणात सायंकाळी साडे चार वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. या कार्यक्रमाच्या नंतर लगेचच ” भारताचे परकीय आक्रमकांशी एक हजार वर्षाचे जागतिक विक्रमी यशस्वी युद्ध ” या विषयावर डॉ रमेश पांडव हे मार्गदर्शन करतील.संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या या कार्यक्रमातच महापराक्रमी राजे दालनाचे हि उदघाटन होत आहे. या दालनात राष्ट्रधर्म रक्षणासाठी महान कार्य करणाऱ्या महापुरुषांचे इतिहासाची माहिती असणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेलपाठक, मानद सचिव संतोष अग्रवाल यांची केले आहे.