पालकमंत्री गिरीष महाजन यांचा पुढाकार
धुळे : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी
24 कोटी 75 लाखाच्या निधीस मंजुरी
ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींना स्वत:चे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने 24 कोटी 75 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही अशा 111 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी मंजूरी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या सर्व ग्रामपंचायत इमारतींचे हरित ग्रामपंचायत म्हणून बांधकाम करण्यात यावे, तसेच ग्रामपंचायतींना सोलरच्या माध्यमातून वीजपुरवठा उपलब्ध केला जावा तसेच बांधकाम करताना हरित संकल्पना जोपासण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. मा. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजनेतंर्गत नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 20 लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जाते तसेच 2 हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना 25 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जातात. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व गावांमध्ये स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध होणार आहे.अशी माहिती पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी दिली आहे.
या योजनेतंर्गत धुळे तालुक्यातील सावळी/सावळीतांडा, कुळथे, खंडलाय खुर्दे, धाडरी, देऊर खुर्दे, रावेर, सैताळे, दह्याणे, सिताणे, चौगांव, निकुंभे, धाडरा, गरताड, लळींग, कापडणे, अंबोडे, गोताणे, सडगांव, नंदाळे ब्रु, चांदे अशा 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
साक्री तालुक्यातील धामणधर, विरखेल, अष्टाणे, शेवाळी मा., आयणे, उभंड, म्हसाळे, नागपूर व, वर्धाने, जामदे, मलांजन, उंभरे, सातरपाडा, भडगांव व, म्हसदी प्र. पिंपळनेर, मापलगांव, जामखेल, धनेर, मंडाणे, किरवाडे, अंबापूर, छडवेल प. खोरी, वेहेरगांव, चिपलीपाडा, वाल्हवे, पांगण, बल्हाणे, टिटाणे, मळगांव प्र.वार्सा अशा 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शिंदखेडा तालुक्यातील वडदे, हिसपूर, कळगांव, चिमठावळ, मेलाणे, विखुर्ले, दरखेडा, वाघोदे, सुकवद, अंजदे खु, जखाणे, दत्ताणे, झोटवाडे, कलमाडी, धावडे, दाऊळ, तामथरे, खर्दे ब्रु, कर्ले, चिलाणे अशा 20 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शिरपूर तालुक्यातील जैतपूर, प्रिंप्री, नांथे, सावेरगोदी, सावळदे, अंतुर्ली, साकवद, रुदावली, बाभुळदे, जापोरे, बाळदे, भोरटेक, हिंगाव, वाडी खु, बोरपाणी, हातेड, नटवाडे, हेंद्र्यापाडा, भोरखेडा, खर्दे ब्रु, खर्दे खु, अजनाड, तोंदे, पिळोदे, जातोडे, बोराडी, खामखेडा, चाकडू, फत्तेपूर, वरझडी, कोडीद, म.दोंदवाडा, सांगवी, न्यू बोराडी, टेंभेपाडा, बुडकी, आंबे, झेडेंअंजन, मालकातर, चांदसे-चांदसुर्या, त-हाड कसबे अशा 41 ग्रामपंचायत इमारतींचा समावेश आहे.
या ग्रामपंचायत इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुन:र्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधनसामुग्रीचा वापर करणार येणार आहे. या ग्रामपंचायतीचे बांधकाम हाती घेतल्यापासून एक वर्षांत या इमारती पुर्ण करावयाच्या आहेत. असे गिरीष महाजन, ग्रामविकास, पंचायती राज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री, धुळे जिल्हा यांनी सांगितले आहे.