शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची खड्डांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अशातच प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतत आहे. दुसरीकडे प्रवाश्यांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामधुन दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधीक कमाई करणारा आगार म्हणून शहादा बस स्थानकाची ओळख असतांनाच पावसाळ्यापुर्वीच या खड्ड्यांची आणि बस स्थानकातील रस्त्याची दुरूस्ती का केली जात नाही असा संतप्त सवाल देखील प्रवाश्यांकडून उपस्थित होतोय.
प्रतिनिधी – सलाउद्दीन लोहार,शहादा