शहादा : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ पुर्ण असून आमचे दोन्हीही उमेदवार निवडूण येतील असा विश्वास राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला. महायूतीकडे असणार संख्याबळ पुर्ण आहे त्यामुळे महाविकास आघाडीनेच आपल्याकडे संख्याबळ आहे कि नाही ते पहावे पैशाच्या भरवश्यावरच महाविकास आघाडीने जास्तीचा उमेदवार उभा केला असल्याच टोला देखील मंत्री अनिल पाटील यांनी लगावला आहे.
नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अनिल पाटील यांना आज पत्रकारांनी विविध विषयावरुन विचारण केली असता यावेळी ते बोलत होते. शासन सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण ही दिले गेले आहे. कुठल्याही गोष्ट अंमलात आणण्यासाठी शासनाला काही कालावधी लागतो. राज्यात मराठा आणि ओबीसी दोघांना न्याय दिला पाहीजे, मुख्यमंत्री त्याच अनुषंगाने प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला दौरा हा त्यांचा प्रश्न असून त्यांनी काय करावे हे शासन ठरवू शकत नाही. आणि महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करावे कि नाही हा मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न असे देखील मंत्री अनिल पाटील म्हणालेत.
सध्या कॉग्रेस पक्षामध्ये दहा जण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना 288 जागा लढवल्या खेरीज पर्याय नाही. शिवसेनेचा मुखवटा पुढे करुन कॉग्रेसमध्ये खलबत्ते सुरु आहे. राज्यात शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे कधीही कॉग्रेसला धोका देवू शकतो ही कॉग्रेसच्या नेत्यांना भिती असल्याचे देखील कॉग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या चर्चा अंती माझा हा वैयक्तीक मत असल्याचे मंत्री अनिल पाटील म्हणालेत.
विधानसभेमध्ये लाडकी बहिन योजनेला 31 ऑगस्ट पर्यत मुदत देण्यात आली आहे. ही निरंतर चालणारी योजना असणार असून 31 ऑगस्ट पर्यत जर कागदपत्रांची पुर्तता करता आली नाही तरीगी कधीही अर्ज भरला अनुदान दिले जाईल. कोणत्याही महिलेचे नुकसान होणार नाही. त्या अनुदानापासून वंचीत राहणार नाही. याची काळजी हे शासन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा नंदुरबार
