धुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात सर्व जागा जिंकल्या

धुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवला. तर, माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा या निवडणुकीत पूर्णतः धुव्वा उडाला. या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी विकास पॅनलने सार्वजगांवर निवडणूक लढवली.. यात बापू खैरनार , संभाजी गवळी , इंद्रसिंग गिरासे , रमेश नांद्रे , कैलास पाटील , दिनकर पाटील , भटू पाटील, रोहिदास विठ्ठल पाटील , चुडामण मराठे , पंढरीनाथ पाटील , सुशिलाबाई चौधरी , अनिता पाटील , लहू पाटील , आणि सुनील पाटील यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुती प्रणित शेतकरी सेवा विकास पॅनलने निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पूर्णतः धुव्वा उडाला असून त्यांना एक हि जागा जिंकता आली नाही. जवाहर शेतकरी विकास पॅनलने विजयानंतर मोठा जलोष केला.आमदार कुणाल पाटील आणि रायबा कुणाल पाटील यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली .. या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा आ.कुणाल पाटलांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब झाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares