शिंदखेडा :- मतदार संघातील गावागावात शाखा निर्माण करा, कार्यकर्त्यांची संख्या वाढवा , संपूर्ण तालुक्यात सेनेचा झंझावात निर्माण करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे डोस पाजले. एकुणच शिंदखेडा मतदार संघातील 338 बुथ व 163 गावाचा समावेश असुन प्रत्येक बुथ वर शिवसेनेचा बुथ प्रमुख असणे आवश्यक आहे. गावागावात शिवसेना शाखा स्थापन करून प्रत्येक बुथ मधील शंभर घरांचा सर्वे केला तरी त्या बुथ वर शिवसेनेची संख्या सहज वाढु शकते. लोकसभेतील शिंदखेडा विधानसभा मतदार संघात 43 हजाराचा मताधिक्य कमी होण्यासाठी प्रत्येक बुथ प्रमुख यांनी जबाबदारी घेवून सभासद नोंदणी करून संख्या वाढवा.जर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करायचे असतील सच्चा मावळा तयार करावा लागेल. लबाड मावळा काही कामाचा नाही. म्हणून प्रत्येक पदाधिकारी यांनी अधिक जोमाने लागण्याची हीच वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना सळो की पळो लावणारा एकच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघ झाला आहे असा घाणाघात यावेळी केला.
धुळे जिल्यातील शिंदखेडा येथिल काकाजी मंगल कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरा घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन केले. या प्रसंगी गावागावात शाखा ,बुथ स्थापन करा , सदस्य नोंदणी करून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे रविंद्र मिर्लेकर यांनी सांगितले. समन्वयक मिर्लेकर यांचा शिंदखेडा, दोंडाईचा प्रमुख पदाधिकारींनी सत्कार केला. यावेळी संपर्क प्रमुख अशोक धात्रक ,उपनेत्या शुभांगी पाटील ,सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक मंगेश पवार, विधानसभा संपर्कप्रमुख राजु पवार, रविंद्र धनावडे , विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, उपजिल्हाप्रमुख भगतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल,तालुका प्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटिल शहर प्रमुख संतोष देसले, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार ,माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील,आदी होते. प्रास्ताविक शानाभाऊ सोनवणे यांनी केले.
युवा मतदाराला सोबत घ्या – धात्रक
संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांनी पदाधिकारींना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेनेने एक वेळा शिंदखेडा मतदार संघाने आमदार दिला आहे. म्हणून यावेळी लोकसभेत आपण जी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्या मेहनत घेतली तर सहज आपण विजयी होऊ शकतो त्यासाठी सभासद संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे. गावागावात शिवसेना मजबूत करा. खरे तर युवा मतदाराला सोबत घ्या असे सांगितले.
शिंदखेड्याला जागा सोडून तर पहा…साळुंके
जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी शिबिरात सांगितले की, गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तरी शिंदखेडा मतदार संघ विविध विकासापासून वंचित राहिला आहे. भाजपाला शिवसेना रोखु शकते. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी गेली अनेक वर्षीपासून आम्ही काम करतोय म्हणून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला देवुन पहा, नक्की शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी आमचा वाटा राहिल.
यावेळी सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शिंदखेडा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी हयावेळी शिवसेनेत प्रवेश केला. हजारोंच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदिप पवार यांनी केले.