दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.
नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
घटनास्थळी परिसरातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, नरेंद्र गिरासे, सचिन मराठे, आदींनी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, हेमंत राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते… तसेच महसूल विभागातील दोंडाईचा शहर तलाठी संजय गोसावी, नारायण मांजळकर आदी वसूल च्या वतीने घटनास्थळी दाखल झाले होते. खूप वर्षानंतर एवढा मोठा पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती…
प्रतिनिधी – समाधान ठाकरे दोंडाईचा