धुळे- शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगाला साकडे घालत अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते व प्रतिपंढरपूर गोताणे येथे पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाचा सोहळा उत्साहात झाला.
प्रतिपंढरपूर गोताणे ता. धुळे येथे वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती ह. भ प. दामोदरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भव्य असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात आले आहे. कळसावरील हेमांडपंथी नक्षीकाम आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे प्रतिरूप गोताणे येथील मंदिरात स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गोताणे हे गाव धुळे तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून संबोधले जाते. आज दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पावनपर्वावर गोताणे येथे विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज पहाटे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या धर्मपत्नी अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी निवृत्त प्राचार्य एस.व्ही. देसले सर यांच्या हस्ते सपत्नीक तसेच चि. रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महापूजेवेळी अश्विनी पाटील यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात भरभराट सुख समृद्धी येवो तसेच समाधानकारक पाऊस बरसू दे! असे साकडे पांडुरंगाला घातले. दरम्यान सकाळी 11 वा. धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि डॉक्टर दिनेश बच्छाव यांनी यात्रोत्सवात मंदिराला भेट देऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. मंदिरावर दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी निवृत्त प्राचार्य एस. व्ही. देसले सर यांच्याकडून दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती माजी सभापती भगवान आप्पा गर्दे, माजी सभापती कैलास पाटील,चि रायबा कुणालजी पाटील, धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, खरेदी विक्रीचे संचालक भटू बापू चौधरी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, बाबाजी पाटील, सरपंच भूषण पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, ज्येष्ठ नेते झुलाल पाटील, दगडू पाटील, माजी चेअरमन धुडकू पाटील, माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील, नितीन पाटील, ज्येष्ठ नेते विठ्ठल पाटील, सेवा सोसायटी संचालक आनंदा पाटील, डॉक्टर संजय पाटील, चुडामण पाटील, दाजभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, सतुलाल पाटील, दंगल पाटील, दिलीप महाजन, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, शिवसेनेचे नाना वाघ,नवल पदमोर, अशोक बागुल किसन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.