दोंडाईचा – पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांची दखल घेऊन दोंडाईचा पोलीसांनी घेऊन एका संशयिताला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून महागडे पंधरा मोबाईलचा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दोंडाईचा पोलीसांना यश आले आहे…
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मागील काही दिवसांपासून दोंडाईचा शहर परिसरातून मोबाईल होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान करून त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून शहरातील जुना शाहदा रोड डालडा मिल परिसरात मेहबूब सुबानी दर्ग्याच्या मागील बाजूच्या भागात चोरीचे मोबाईल फोन विक्री करित असलेल्या संशयित शाहिद जावेद शेख उर्फ खत्री रा. अशोक नगर दोंडाईचा ता. शिंदखेडा याने मागील काही दिवसात शहरासह परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेले महागडे १५ मोबाईल फोनची चोरट्या मार्गाने विक्री करत असताना रंगेहाथ पकडण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले. त्याच्या कडून एकूण एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, असई राजन दुसाने, सुनील महाजन, पुरुषोत्तम पवार, अनिल धनगर, हिरालाल सूर्यवंशी, हर्षिद बागुल, संदेश बैसाणे, चालक नरेंद्र शिरसाठ, प्रवीण निंबाळे, राजेंद्र ऐडाईत, प्रवीण निकुंभे, निर्मल वंजारी आदींनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन करीत आहे..