धुळे- ( प्रतिनिधी ) धुळे शहरा लगत सुरत बाय पास रस्त्यावर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस लुटणाऱ्या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या कडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. दादाभाऊ बारकू पारधी रा. कुंडाणे हे २५ जून रोजी रात्री ११ वाजता सुरत बाय पास रस्त्याने सिव्हिल हॉस्पिटलला जात असताना मागून मोटारसायकल ने आलेल्या ३ अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण करून त्यांच्या त्यांचा मोबाइल, पाकीट व व त्यातील साहित्य, तसेच रोख रक्कम लांबवली.
या गंभीर गुन्ह्याची दाखल घेत धुळे शहर पोलिसांची तपास सुरु केला. हिस्ट्री शिटरआरोपी बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड रा. राऊळवाडी व भूषण शिवदास पाचारे रा. नवजीवन नगर फाशी फुल आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन याना मिळाली. मात्र यापूर्वी मोहाडी हद्दीत झालेल्या एका गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात कोठडीत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडून रोहन अनिल अवचित्ते रा चितोड रोड आणि सागर जगदीश प्रजापती रा. सुशील नगर या दोघांची नावे कळली. त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून मोबाईल,पाकीट, पॅनकार्ड, एटीएम कार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा पंचववन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी हे करीत आहेत.
हि कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हे.कॉ दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, पो.ना. रवींद्र गिरासे, कुंदन पटाईत, कॉ. शाकीर शेख, महेश मोरे,प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, तुषार पारधी, अमित रणमळे, वसंत कोकणी, अमोल पगारे, योगेश ठाकूर, दिपक सैंदाणे यांनी केली.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे,धुळे