निवृत्त शिक्षकांची पुंजी घेऊन चोरट्यांचा पोबारा

धुळे : प्रतिनिधी I शहरातील राजगुरु नगरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. यात बारा ग्राम सोने- चांदीसह, पंधरा हजार रोख रुपये लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.
शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत राजगुरुनगर प्लॉट नंबर 39/41 येथे सेवानिवृत्त शिक्षक मधुकर रामचंद्र धात्रक हे राहतात. रात्री चोरटयांनी घराचा काडी कोयंडा तोडून आत शिरकाव केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त करीत 12 ग्रॅम सोने-चांदीच्या वस्तू तसेच पंधरा ते वीस हजार रुपये रोख लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी  स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे,धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares