धुळे, प्रतिनिधी I धुळे ग्रामीणमध्ये शिवसेनेचा झंझावात पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. हिलाल माळींच्या नेतृत्वात शिवसैनिक सज्ज होत असून २००९ साली झाला तसा चमत्कार यावेळी घडेल आणि विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीणवर पुन्हा एकदा भगवा फडकेल. असा विश्वास माजी आ.प्रा.शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हिलाल माळींचे कार्य जोमाने सुरु असल्याने जनता त्यांना नक्की आशिर्वाद देईल, असे मत माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांनी व्यक्त केले.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून २० जुलै ते २० ऑगस्ट महिनाभर भरगच्च समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी काल सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्या पुढाकाराने धुळे तालुक्यातील इच्छापुर्ती गणपती मंदिर येथे शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्याचे औचित्य साधत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात हिलाल माळी यांच्या प्रचाराचे शिवसैनिकांनी रणशिंग फुकले.
यामेळाव्यात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा धुळे ग्रामीणचे संभाव्य उमेदवार हिलाल माळी यांच्यासह माजी आ. शरद पाटील, महेश मिस्तरी यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन हिलाल माळी यांनी केले.
तसेच यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेरोजगार तरूणांसाठी महानोकरी मेळावा, वृक्षरोपण व रक्तदान शिबीर ,मतदार नोंदणी, शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडवणे, ज्या नागरीकांकडे रेशन कार्ड नसेल अश्या सर्व नागरीकांना रेशनकार्ड मिळवून देणे, संजय गांधी श्रावण बाळ योजनेपासून वंचीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, आधार कार्ड, दिव्यांग बांधव माता भगिनींना जे पात्र असतील अश्या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, शिवसेना फलक आवरण असे विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्याची घोषणा शिवसेना सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी केली आहे.
या नियोजनाच्या बैठकीस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.आ.शरद पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा समन्वयक चंद्रकांत म्हस्के, माजी तालूकाप्रमुख नाना वाघ, तालूका संघटक देवराम माळी, तुषार पाटील, अरूण धुमाळ आदी पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर बैठकीत वरील योजना कश्याप्रकारे राबवले जातील यासंदर्भात चर्चा होवून जबाबदारी निश्चित करण्यात आली. या नियोजनाच्या बैठकीस शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतूल सोनवणे, मा.आ.शरद पाटील, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, किरण जोंधळे, महानगरप्रमुख सुशिल महाजन, धिरज पाटील, जिल्हा समन्वयक चंद्रकांत म्हस्के, आधार हाके, तालूकाप्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, महिला आघाडी संघटक हेमलात हेमाडे, माजी महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील माजी तालूकाप्रमुख नाना वाघ, तालूका संघटक देवराम माळी, तुषार पाटील, महिला आघाडीच्या संगिता जोशी, अरूणा मोरे, जयश्री वानखेडकर, सुनिता वाघ आदी पदाधिकार्यांसह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपस्थित होते.
