अमित शाह हे तडीपार गृहमंत्री – जयंत पाटील यांचा घणाघात

शिंदखेड्यात राष्ट्रवादी निष्ठावंतांचा मेळावा

दोंडाईचा । प्रतिनिधी
देशात 400 पार करण्याचा नारा देणाऱ्यांना 240 वर थांबवले यात खरा लोकशाहीचा विजय झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदखेडा येथे मन मिरा मंगल कार्यालयात निष्ठवांत कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.. महाविकास आघाडीच्या काळात सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असे सांगत आमदार पाटील पुढे म्हणाले की, प्रकाशा बुराई योजनेसाठी देखील निधी दिला या सरकारने या बजेट मध्ये कुठलीही तरतुद केली नाही. यासाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी केली आहे. भाजपात निष्ठवंतानां किंमत राहीली नसल्याचे सांगत यामुळेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम यांना भाजप पक्ष सोडावे लागले असल्याचे सांगत भाजपाचा पुणे येथील अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या भष्टाचार आरोपांबाबत समाचार घेत अमित शाह हे तडीपार गृहमंत्री असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असुन त्यांचावर आतापावेतो एकही आरोप सिद्ध झालेला नाही. या सरकारने 7 लाख 80 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा करुन ठेवला असुन देशात राज्यात महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर नेऊन ठेवला असल्याचे सांगत आगामी काळात कार्याकत्यांनीनी कामाला लागावे या मेळाव्यात असलेला नवचैतन्य निवडणुकी पर्यंत ठेवा व्यासपीठावर असलेल्या इच्छुक उमेदवारांना सांगितले की,जे इच्छुक उमेदवार आहे त्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी पक्ष देईल त्या उमेदवारांच्या पाठीमागे पुर्ण ताकदीने उभे राहण्यासाठी इच्छुक उमेदवार यांचे कडुन व्यासपीठावर वधवुन घेतले यावेळी बुथ कमेटी बनवुन कामा लागा असे सांगत आगामी काळात राज्यात देखील महाविकास आघाडीचे सरकार येणार असुन शिंदखेडा मतदार संघातील विकासासाठी निधी कमी पडुन देणार नाही. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान महिला प्रदेशाध्यक्षा रोहीणी खडसे यांनी भाजपावर सडाडुन टिका केली राज्यात माहगाई वाढली असुन तरुणांना बेरोजगार करण्याचे काम युती सरकारने केल्याचा आरोप केला.
कामराज निकम यांनी आपल्या मनोगतातुन आमदार रावल यांच्यावर टिका केली या तालुक्यात कुठलाही उद्योग धंदा आणला नाही . सिंचनासाठी कुठलाही निधी आणला नाही तालुक्यात आमदारांची दादागीरी वाढली असुन त्यास नागरिक त्रासले आहेत. यासाठी स्वतः चा विकास केला असुन आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा मतदारसंघाचत परीवर्तन करण्याचा निर्धार बोलुन दाखविला.
यावेळी संदीप बेडसे यांनी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी महाविकास आघाडीचे सरकारचा काळात निधी मिळवुन दिला तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी आमदारांनी कुठलाही निधी आणला नसल्याचे सांगितले.
यावेळी युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी राज्य सरकार व आमदारांवर टिका केली. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असुन यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज निकम, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, कुसुमताई निकम, माजी नगराध्यक्ष जूई देशमुख, म्हसावद जिल्हा परिषद गटाचे सदस्य हेमलता शितोडे, अमित पाटील, त्र्यंबक पदमोर, डॉ. जितेंद्र ठाकूर, ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग गिरासे, कय्यूम पठाण, राजू देशमुख, गिरधारीलाल रामराख्या, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे, एन. सी. पाटील, राकेश पाटील, विठ्ठलसिंग राजपुत, प्रदेश संघटक शिवाजी पाटील, निरीक्षक उमेश पाटील, डॉ.अमित पाटील, डॉ.नितीन चौधरी, तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे, अरुण पाटील, प्रकाश बोरसे, दुल्लभ सोनवणे उपस्थित होते. यासह आधी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नील निकम, पवन पवार, दुर्गेश पाटील, निलेश निकम, नरेश पवार, खंडु सिसोदे, निलेश निकम यांनी परीश्रम घेतले.
प्रतिनिधी – समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares