अर्थसंकल्पात महाराष्ट्राची फसवणूक-संदीप बेडसे

शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन

धुळे I नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाट्याला घोषणांचा पाऊस करून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे केंद्राच्या या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मध्यमवर्ग यांच्यासाठी क्रांतिकारी योजना नसल्याने केंद्र शासनाचा आपण निषेध करीत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव व उत्पन्न दुप्पट करण्याची आश्वासने ही निवडणुकीतील फसवीगिरी ठरली आहे. त्यामुळे दि. २४ जुलै रोजी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा परिषद सदस्यललित वारुडे, तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, प्रकाश पाटील, दुर्लभ सोनवणे, उल्हास देशमुख सतीश पाटील, दयाराम कुवर,महेंद्र निकम, देविदास मोरे, देवानंद बोरसे,सुरेश अहिराव,सतीश पाटील, दुर्गेश पाटील, निलेश देसले, संजय वाल्हे , प्रविण पाटील,श्याम पाटील,नरेश शिरसाठ, सागर पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares