धुळे – नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही. कर्जमाफीबद्दल शब्द नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. यामुळे आज २६ जुलै रोजी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी भाजपा सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाही देण्यात आल्या.
देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे . उन , पाऊस वारा, थंडी याचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवितो,भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आपल्या देशातील बहुतांश उद्योग धंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. नुकताच जाहिर झालेल्या केंद्र सरकारने अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली नाही. एम एस पी वाढीचा उल्लेख नाही .कर्जमाफी बद्दल शब्द नाही ,केंद्र आणि राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकरी जगाल तर देश जगेल, शेतकऱ्यांनी धान्य उत्पादन थांबवले तर देशात अराजकता माजल भूकबळी होईल ,परंतु या वास्तवाचे भान केंद्र आणि राज्य सरकारला नाही ,हे सरकार शेतकरी विरोधी आहे त्यामुळे आम्ही या शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत तसेच तात्काळ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली .
यावेळी माजी .आ. डि.एस.अहिरे, शहराध्यक्ष डॉ अनिल भामरे, सभापती बाजीराव पाटील, अँड बी.डी.पाटील, पंढरीनाथ पाटील, राजेंद्र खैरनार, गणेश गर्दे, बापु खैरनार, संतोष राजपूत, प्रवीण चौरे, संजय पाटील, विश्वास उपस्थित होते. प्रमोद सिसोदे, शामकांत भामरे, भगवान गर्दे, पी एस पाटील, कपिल जाधव, सुधीर जाधव, सागर देसले, युवराज चौरे, भानुदास गांगुर्डे, सोमनाथ पाटील, रवींद्र चौधरी, हरिश पाटील, दिपक साळुंखे, विलास पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे पवार, अय्युब खाटिक उपस्थित होते.