धुळे I प्रत्येकाला दररोज कुठे न कुठे, कोणती न कोणती वस्तू खरेदी करावीच लागते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आरोग्याच्या समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मेडिसिनवर अमाप खर्च होणे, हे सारे टाळता येणारे नाही. परंतु महागाईमुळे जनत्याला होणारा त्रास विचारात घेऊन धुळे महानगरीत सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी ही चिंता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याची अनोखी शक्कल लढवून स्वतंत्र ऍप डिझाईन केले आहे. या ऍपच्या माध्यमातून धुळेकरांना सेवा व खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे. आजपासून हे ऍप धुळेकरांच्या सेवेत समर्पित करीत असून विशेष म्हणजे हे ऍप पूर्णपणे मोफत असल्याची माहित त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अँप च्या माद्यमातून खजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णालये, कृषी सेवा केंद्र, ड्रायव्हिंग स्कूल , रेस्टोरंट अशा अनेक ठिकाणी डिस्काउंट सवलत मिळणार आहे. सर्वसामान्य धुळेकरांचा विचार करून ‘माझे शहर,माझी जबाबदारी’ या उक्तीला बांधील राहून डिस्काउंट देणाऱ्या स्वतंत्र ऍपचे आजपासून लोकार्पण केले. धुळे शहरातील वेगवेगळे व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा देणाऱ्या बांधवानी धुळेकर जनतेसाठी डिस्काउंट देणे मान्य केले. अजूनही बरेच जण डिस्काउंट देण्यासाठी तयार आहेत. यापेक्षा मोठ्या सन्मानाची बाब काय असू शकते? या साऱ्यांचे अनुप अग्रवाल यांनी आभार मानले आहेत.
कसे आहे नेमके हे.. ऍप
धुळेकरांना डिस्काउंट देणारे हे ऍप वापरणे अगदी सोपे आहे. आपल्या मोबाईलमध्ये एक लिंक येईल ती ओपन करून ग्राहक म्हणून त्यात स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, वय, पत्ता अशी प्राथमिक माहिती भरताच आपला संपर्क आपोआप अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाशी होईल आणि तेथे नोंद झाल्यावर आपल्या मोबाईलवर परत या संदर्भातील युजर नेम पासवर्डचा मेसेज येईल.आपण मोबाईलमध्ये पासवर्ड टाकताच हे ऍप ऍक्टिव्ह होईल. त्यात वेगवेगळ्या व्यावसायिकांची, हॉस्पिटलची यादी दिसेल. कुणाकडे किती डिस्काउंट मिळेल हे ही त्यात दिसणार आहे. हॉस्पिटल किंवा दुकानात जाऊन ऍप ओपन करायचे. त्यात अनुप अग्रवाल यांच्या नावाचे स्कॅनकोड स्टिकर लावलेले असेल. त्यावरचा बारकोड ऍपमध्ये स्कॅन केल्यास आपणास डिस्काउंट सुविधा मिळेल.
असे होतील ऍपचे फायदे..
या ऍप मध्ये सध्या शहरातील शंभराहून अधिक व्यावसायिक आणि काही हॉस्पिटल्स समाविष्ट आहेत. जसे, टेस्टिंग लॅब, क्लिनिक्स, किराणा दुकान, हार्डवेअर,फुटवेअर,कॉस्मेटिक, सलून ,डेअरी प्रोडक्ट, बेकरी, इत्यादींचा समावेश असून त्यांच्याकडे आपल्या ऍपमुले १०% ते ३०% पर्यंत डिस्काउंट मिळेल काही हॉस्पिटल मध्ये ओपीडीवर २५% तर ऍडमिट केल्यावर बिळात २० ते ३० टक्के पर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. यामुळे धुळे शहरातील सामान्य कुटुंबांची हजारो रुपयांची बचत होणार आहे
.
केवळ राजकीय हेतू न ठेवता आपण या शहराचे आणि इथल्या नागरिकांचे देणं लागतो या विधायक भावनेतून अनुप अग्रवाल यांनी हे डिस्काउंट देणारे अनोखे ऍप धुळेकरांच्या सेवेत दाखल केले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.या पत्रकार परिषदेला अनुप अग्रवाल यांच्यासह माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, हिरामण गवळी, भारती माळी, किरण कुलेवार, नागसेन बोरसे, ऍड रोहित चांदोडे, भगवान गवळी, राजेश पवार, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, संदीप बैसाणे, विक्की परदेशी, मोहन टकले, दिनेश बागुल आदी उपस्थित होते.