धुळे पालक अकाली गेल्यामुळे अनाथ झालेले, गरीब, वंचित, परिस्थिती मुळे काम करून शिक्षण घेणाऱ्या धुळे शहरातील समता शाळेतल्या गरजू 60 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ अभिनय दरवडे आणि त्यांच्या पत्नी डॉ मिनल दरवडे यांनी गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ चे वाटप केले.. गणवेश नाही म्हणून शिक्षण थांबायला नको हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ अभिनय दरवडे यांनी सांगितले की, परिस्थितीमुळे अडथळे आले तरी त्यावर मात करून शिक्षण पूर्ण करणं किती गरजेचे आहे आणि शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते.लाडक्यांसाठी योजना राबवणाऱ्या राजकारण्यांना या खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांचा विसर पडावा ही खरी शोकांतिका आहे. शाळेच्या आवारात दारूचे अड्डे बनवून शिक्षणाचा अपमान करणाऱ्या मानसिकतेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका, आणि शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.