आरंभ फाउंडेशन ने राबविला उपक्रम
धुळे -आपल्या दैनंदिन जीवनात रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ताणतणाव वाढतच असतो. त्याचे नियोजन कशाप्रकारे केले आणि सकारात्मक विचार शैली ठेवून कामाचे नियोजन केले, तर ताण तणाव कमी करता येऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले. प्रशिक्षणार्थी पॉकीस बांधवांसमोर ते बोलत होते.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आरंभ फाउंडेशन च्या वतीने दिनांक 27 जुलै रोजी ताण ताण तणाव निर्मूलनाबाबत कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ दत्ता देगावकर, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विनायक देवकर, जयवंत पगारे, श्रीमती माधवी वाघ, समाधान वाघ, सतीश वळवी, श्रीमती नयना देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ताण तनाव व्यवस्थापन (ट्रेस मॅनेजमेंट) या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याकरिता जिल्हा रुग्णालय धुळे येथील मानसिक आरोग्य केंद्राचे प्रमुख तथा मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश मेहरा, डॉ जगदीश झिरे, ओमकार गुंजाळ, दिपाली गिरमकर यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर सखोल माहिती दिली. आपल्या नेहमीच्या जीवनात ताणतणाव वाढतो त्याचे नियोजन कशाप्रकारे करावे व सकारात्मक विचार शैली ठेवून कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करून आपल्या कामाचा ताण कशाप्रकारे कमी करावा याबद्दल आपल्या व्याख्यानातून प्रशिक्षणार्थींना संबोधित केले.
या व्याख्यानास सुमारे 650 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान प्रशिक्षणार्थींनी केलेले प्रश्नांचे उत्तरे देऊन तज्ञांनी समाधान केले. तसेच जिल्हा रुग्णालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम पथक कार्यान्वित असून आपणास ताण तणाव किंवा यासंबंधी काही प्रश्न असल्यास आपण संपर्क साधावा तसेच 14416 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून अधिक माहिती जाणून घेऊ शकतात असे तज्ञांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करणे करिता आरंभ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शेवतकर, खजिनदार राहुल याद्निक व मानसिक आरोग्य विभागाचे नितीन गोंधळी, परवेज खाटीक यांनी परिश्रम घेतले.