अतिरिक्त एपीआय निलेश मोरे कडून निरीक्षक किशोर परदेशी यांनी स्विकारला पदभार
दोंडाईचा- (श. प्र.) जनहितार्थ, प्रशासकीय कारणावरून तसेच कायदा सुव्यवस्थाची स्थिती प्रभावीपणे अंमलबजावणीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बदली नरडाणा पोलीस ठाणे येथे झाली असून त्यांच्या जागी धुळे नियंत्रण कक्ष येथील पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी २८ रोजी दुपारी निलेश मोरे यांच्याकडून निरीक्षक किशोर परदेशी यांनी पदभार स्विकारला. सध्या तरी परदेशी यांच्यासमोर अवैध धंदे, गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान राहणार आहे.
दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची प्रशासकीय कारणावरून नरडाणा पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी धुळे नियंत्रण कक्षात असलेले प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांची दोंडाईचा पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सा. पोलीस निरीक्षक यांनी सहा महिन्याच्या प्रशासकीय कालावधी पुर्ण केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री मोरे यांनी फेब्रुवारी ६ रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. श्री मोरे यांनी कार्यभार घेतल्यानंतर अवैध दारू घरफोडी, मोटरसायकल, मोबाईल चोर यांचा तपास त्यांनी यशस्वीरित्या लावून चोरट्यांना जेरबंद केले होते.
परंतु मागील काळात शहरासह ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यासह घरफोडी, मोटारसायकल, मोबाईल आदी चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याला प्रतिबंध घालण्याचे पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्यासमोर आव्हान असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शहर परिसरातील वाढलेली गुन्हेगारी, अवैध धंदे, शहरातील सुसाट अवजड वाहतूक, ट्रिपलसीट दुचाकी पळवणारे या सह आदी गोष्टींना लगाम लागण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी यांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा दोंडाईचा शहर परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रतिनिधी – समाधान ठाकरे, दोंडाईचा