तलाठी संजीव गोसावी यांनी केले आवाहन
दोंडाईचा- शहरासह ग्रामीण भागातील खरीप पिकाची पीक पाहणी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट पासून लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी केले आहे.
यावर्षी खरीप पिक पाहणी मोबाईल द्वारे नोंदवून घेण्यास सोशल मीडियावर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आवाहन करण्यात येणार आहे. पिक पाहणी मोबाईलद्वारे न लावल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पीक पाणी लावून घ्यावी असे आवाहन तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा शहर तलाठी संजीव गोसावी म्हटले आहे. खाते नंबर व भूमापन नंबर अचूक निवडणे. एकूण क्षेत्राची पिक पाहणी न लावता पोट खराब क्षेत्र वगळून फक्त विहित क्षेत्राचे पीक पाहणी लावणे. पिकाचे वर्ग निवडताना निर्भीड पिक निवडणे. फळबाग असेल तर पिकांचा हंगाम पूर्ण वर्ष निवडणे. जलसिंचनाची साधने आपल्या गटावर उपलब्ध नसतील अर्थात जमीन कोरडवाहू असेल तर जलसिंचनाची साधने म्हणून अजलसिंचीत (कोरडवाहू) हा पर्याय निवडावा. ज्या गटांची पीक पाणी नोंदवायची आहे त्या गटावर शेतात मध्यभागी जाऊन पिकाचा स्पष्ट फोटो काढून अपलोड करावा तात्काळ पीक पाहणी लावण्या..
व तसेच खरीप अनुदान दुष्काळी अनुदान प्राप्त झाले असून ज्या खातेदारांनी तलाठी यांच्या माध्यमातून आधार कार्ड बँक पासबुक दिलेले असेल त्या संबंधित शेतकऱ्यांनी व्हि के नंबर घेऊन एक केवायसी जवळच्या माई सेतू केंद्रामध्ये करून घ्यावे असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.