अचानक नाकाबंदी, ९ विना नंबर वाहने जप्त, ११ हजार पाचशे रुपये दंड वसूल, पाच ठिकाणी जुगारावर कारवाई
दोंडाईचा- येथे दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक ठिक ठिकाणी शहरात नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दोन वेगवेगळ्या कारवाई करून यात विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करून अकरा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईत जुगार कायद्याखाली कारवाई करुन पाच गुन्हे दाखल करून आठ संशयीत आरोपींता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार हजार चारशे साठ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साधने अस्तगत करण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या आदेशानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक हेमंत राऊत, असई राजन दुसाने, पोहवा सुनील महाजन, चालक नरेंद्र शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सुर्यवंशी, अनिल धनगर, प्रकाश पावरा, ललित काळे, देविदास चोरे, प्रशांत गोराडे, तुषार पवार, राकेश पाटील, राकेश पावरा, आदींनी केली आहे…