हातातोंडाशी आलेले पीक जास्त पावसाने निकामी झाल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क बकऱ्याच चारल्या आहेत.
शहादा तालुक्यातील पाडळदा गावच्या रहिवाशी असलेल्या अर्जुन भगवान चौधरी यांनी चिखली शिवरातील आपल्या चार ऐकर शेतात अडीच महिन्यापुर्वी सव्वा ते दिड लाख खर्च करुन मिर्चीची लागवड केली. मात्र जास्त पावसामुळे हे मिर्ची पिकच निकामी झाले आहे. या नुकसानी बाबत कृषी विभागाला अवगत केले असता, एका दिवसात 65 मिली पाऊसाची नोंद झाल्याखेरीज पंचनामे करु शकत नसल्याचे कारण देत त्यांनी हात वर केल्याने अखेर नाईलाजाने या शेतकऱ्याने आपल्या चार एकर क्षेत्रातील मिर्ची पिक उपटण्यास सुरवात केली. या शेतात ते जनावरांचे तरी पोट भरेल या उद्देशाने बकऱया चारत आहे.
मुळातच शासनाने पीक विम्याची सुविधा सुरु केली मात्र त्यात मिर्ची पिकाचा समावेशच नसल्याने शेतकरी अशा पद्धतीने संकटात सापडतांना दिसून येत आहे.
प्रतिनिधी सलाउद्दिन लोहार, शहादा