धुळ्यात जि.प. शिक्षण विभागातील अधिक्षिका मीनाक्षी गिरी यांना रंगेहात पकडले
धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षिका मीनाक्षी भाऊराव गिरी यांना चक्क 2 लाख रुपयांची लाच घेताना आज 20 ऑगस्ट रोजी रंगेहात पकडण्यात आले. श्रीमतीगिती यांच्याकडे वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालायचाही अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी महानगर पालिकेच्या हायस्कुल मध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचे एप्रिल 2022 ते अक्टोबर 2023 दरम्यानचे थकीत वेतन आणि ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हपता मंजूर होऊनही त्यांना ही रक्कम मिळाली नव्हती. म्हणून ते पुन्हा पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात अधिक्षिका श्रीमती गिरी यांच्या कडे चकरा मारत होते. परंतु ययाना या ना त्या कारणाने परतवून लावले जातात होते. 15 ते 20 दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी पुन्हा त्यांची भेट घेतली असता त्यांच्या कडे श्रीमती गिरी यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार आज 20 रोजी सापळा रचून श्रीमती मीनाक्षी गिरी यांना त्यांच्याच कार्यालयात तक्रारदाराकडून 2 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीकढक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, मकरंद पाटील,रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.