महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात निषेध आंदोलन
धुळे- महाराष्ट्रात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधार्यांच्या भावना बोथड झाल्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणार्या दोषींना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी करीत आ.कुणाल पाटील यांनी बदलापूर घटनेचा निषेध केला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनेच्यावतीने आज गांधी पूतळ्याजवळ काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
बदलापूर येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा पक्ष, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी तसेच पुरोगामी संघटनेच्यावतीने शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बदलापूर येथील घटना आणि संवेदनाहीन महायुती सरकारच्या निषेध व्यक्त करीत आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बदलापूर येथील शाळकरी मुलीवर नराधम कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या कुटूंबियांना बारा तास ताटकळत बसून ठेवले जाते.ही महाराष्ट्रासाठी दुर्देवी घटना आहे. सत्ताधार्यांच्या भावना बोथट झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि बदलापूर घटनेतील दोषींना फासावर लटकवा अशी मागणी यावेळी आ.कुणाल पाटील यांनी केली. निषेध आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई.नगराळे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्त्री, शिवसेना नेते हिलाल माळी, माजी आ.प्रा.शरद पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, जोसेफ मलबारी, प्रथम महापौर भगवान करनकाळ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, जि.प.सदस्य अरुण पाटील, डॉ.सुशिल महाजन, शिवसेना नेत्या शुभांगीताई पाटील, ज्येष्ठ नेते एन.सी.पाटील, प्राचार्य बाबा हातेकर, शिवसेनेचे कैलास पाटील, ललित माळी, हेमाताई हेमाडे, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, राजेंद्र जैन, रामदास जगताप, धिरज पाटील, गुलाब माळी, माजी नगरसेवक मुझफ्फर हूसैन, गोपाल अन्सारी, अफसर पठाण, रविंद्र चौधरी, सेवा दलाचे राजेंद्र खैरनार, महिला काँग्रेसच्या भावना गिरासे, छायाताई पाटील, अॅड.करुणा पाटील, अरुण धुमाळ, नंदू यलमामे, छोटूभाऊ माळी, किरण जोंधळे, सुरेश बैसाणे यांच्यासह महाविकास आघाडी आणि पुरोगामी विचार संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.