धुळ्यातील प्रा.डॉ. पंडित घनश्याम थोरात ठरले “पद्मश्री” साठी नॉमिनी

धुळे : गेली अनेक वर्षे ट्रॅफिक सेन्स,सामाजिक न्याय,शिक्षण या विषयाशी मनस्वी बांधिलकी जपत आपल्या अभ्यास पूर्ण वक्तृत्वाने आणि प्रतिभासंपन्न गायनाद्वारे हजारो लाखो लोकांना अविरत पणे विवेकवादाचे प्रबोधन करणारे विधी अभ्यासक, प्रसिद्ध रंगकर्मी, मानसतज्ञ, प्रा. डॉ. पंडित घनश्याम पुंडलिक थोरात हे संपूर्ण धुळे जिल्हयातून देशाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारा साठी एकमेव नोमिनी ठरले आहेत. धुळे जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्यांना शुभेछा दिल्यत.
“पोलीस सायन्स अँड इमोशनल इंटेलिजन्स “या विषयावरचा अभ्यासपूर्ण शोध प्रबंध असो की “आंबेडकर राईटस अँड इट्स फंडामेंटल कन्सेप्ट ” सारखा शोध प्रबंध असो प्रा. डॉ पंडित घनश्याम थोरात यांनी गेल्या वर्षी इंटरनेशनल सायंटिफिक रिसर्च अमेरिका व वर्ल्ड सायंटिफिक रिसर्च यूके चा इंटरनेशनल बेस्ट रिसर्च स्कॉलर अवॉर्ड प्राप्त करून आपल्या चतुरस्र व्यासंगाचा दमदार परिचय करून दिला आहे. रंगभूमी विश्वात सर्वात जास्त डिग्री होल्डर असलेला कलावंत म्हणून त्यांची जागतिक पातळीवर विश्व रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून देशातल्या कै .बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, महाकौशल विद्यापिठ जबलपूर, स्वामी विवेकानंद विद्यापिठ सागर (मध्यप्रदेश), नॅशनल नॅक कमिटी ने त्यांना ” बेस्ट रिसर्च स्कोलर म्हणून यापूर्वीच गौरविलेले आहे. प्रा डॉ. घनश्याम थोरात यांनी नुकतेच लर्निग कॉलेज लंडन च्या पोस्ट ग्रुज्युएशन इन स्कूल सायन्स अँड चाईल्ड सायकॉलॉजी विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. लंडन इथल्या आर्ट ऑफ सोसायटी ने त्यांची जागतिक दर्जाच्या ब्रुकलीन इंटरनॅशनल अवार्ड साठी निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top